नवोदय ऑनलाईन टेस्ट 3
नवोदय ऑनलाईन टेस्ट 3
विषय : भाषा
उतारा-3 (2017)
पुढील प्रत्येक उतारा काळजीपूर्वक वाचा. प्रत्येक उताऱ्याखाली पाच प्रश्न दिले आहेत. प्रत्येक प्रश्नासाठी (A), (B), (C) व (D) अशी चार संभाव्य उत्तरे दिली आहेत. यांपैकी योग्य उत्तराची निवड करा आणि योग्य उत्तराच्या पर्यायाचे वर्तुळ काळे करा :
तपकिरी अस्वल हा एक सर्वभक्षी प्राणी आहे. याचा अर्थ असा की ते वनस्पती आणि प्राणी दोन्ही खाते. अस्वलाना आपल्या निवासक्षेत्रामधील मुख्य प्रबळ प्राणों असल्यामुळे ते मोठ्या प्राण्यांचीदेखोल शिकार करू शकते, तरीपण सर्वसामान्यपणे ते केवळ छोट्या प्राण्यांना खाते. तपकिरी अस्वलाने कुठल्याही प्रकारचे अन्न भक्षण केले, तरी या प्राण्याचे मोठाले पोट भरण्यासाठी अन्नाचे प्रमाण प्रचंड लागते. बऱ्याचदा अन्न थोड्या-थोड्या प्रमाणातच प्राप्त होते. म्हणून अन्नाचा शोध को संपतच नाही. वसंत ऋतूमध्ये तपकिरी अस्वले गवत, पाने, मुळे (वनस्पती) आणि शेवाळ खातात. बऱ्याचदा तो मुंग्या, भुंगे, रातकिडे आणि इतर कीटकांच्या शोधात छोटे दगड आणि मोठाले खडकदेखील उलटून टाकतात.
1. तपकिरी अस्वल काय खाते?
(A) वनस्पती आणि प्राणी दोन्ही
(C) अगदी छोटे प्राणीच फक्त
(B) फक्त मोठे प्राणी
(D) केवळ पाने आणि शेवाळे,
2. ते मोठ्या प्राण्यांची शिकार करू शकते; कारण-
(A) त्याचा आकार प्रचंड असतो.
(B) ते सहज उपलब्ध असतात.
(C) त्याची वृत्ती प्रबळपणाची असते.
(D) त्यांच्यापासून भरपूर अन्न प्राप्त होते.
3. तपकिरी अस्वले
ऋतूमध्ये बहुधा गवत, पाने, मुळे वर्गरे खातात.
(A) वर्षा
(B) वसंत
(C) हेमंत
(D) ग्रीष्म.
4. ती खडकांच्या खालील……………खात नाहीत.
(A) वनस्पती
(B) शेवाळ
(C) मुंगे
(D) कीटक.
5. 'सर्वभक्षी' म्हणजे असा प्राणी की, जो खातो.
(A) केवळ वनस्पती
(B) केवळ कीटक
(C) वनस्पती आणि प्राणी दोन्ही
(D) केवळ प्राणी.
👉
Comments
Post a Comment
Thank you for you answers...